प्रतिनिधी .
अलिबाग – करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीमुळे रायगड जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या कुशल, अकुशल बेरोजगार उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर नाव नोंदणी करावी. यापूर्वी या पोर्टलवर नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली नाव नोंदणी आधार लिंक करावी तसेच या पोर्टलवर नाव नोंदणी केल्यावर स्थानिक उद्योजकांना कमी पडत असलेले कुशल, अकुशल मनुष्यबळ या पोर्टल मार्फत आपल्या शैक्षणिक, तांत्रिक व जेष्ठते प्रमाणे उद्योजकांकडे नावाची शिफारस करण्यात येईल.
जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी आपल्याला कुशल, अकुशल मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला असल्यास आमच्या वरील वेबपोर्टलवर त्याचे नोटिफिकेशन करावे जेणेकरून ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करून आपल्याला हवे असलेले कुशल, अकुशल मनुष्यबळ या कार्यालयामार्फत उपलब्ध करून देणे शक्य होईल. सर्व उद्योजक व सर्व बेरोजगार युवक-युवतींना आवाहन करण्यात येते की त्यांनी आमच्या वेब पोर्टलवर त्वरित नाव नोंदणी करावी. ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केली असेल त्यांनी आपला डाटा आधार लिंक करून घेण्यात यावा. जेणेकरून उद्योजकांना मनुष्यबळाची उपलब्धता होणे सोपे होईल व करोनामुळे जे स्थानिक बेरोजगार उमेदवार असतील त्यांना आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.
बेरोजगार उमेदवारांना किंवा उद्योजकांना नाव नोंदणी करण्यास काही अडचण असल्यास त्यांनी कार्यालयीन दूरध्वनी क्र.02141-222029 किंवा भ्रमणध्वनी क्र.9820452264 शा.गि.पवार तसेच क्र.7276686535 सं.अ. वर्तक यांचेशी संपर्क साधावा.