प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरातील आभा इमारतीत असलेल्या आयडीबीआय बँकेचा ए .टी.एम फोडुन ४९ लाख रक्कम लंपास करणाऱया तीन आरोपी पैकी एक बँकेचा एटीएम ऑपरेटर म्हणजेच त्याचाच कर्मचारी निघाला आहे, त्यामुळे कुंपणाने च शेत खाल्याची प्रकार घडला आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोरांच्या मुसक्या आवल्या आहेत त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे .
कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरातील आभा इमारतीत असलेल्या आयडीबीआय बँकेचा ए .टी.एम फोडुन शुक्रवारी ,ता ०५ जून रोजी दरोडा टाकण्यात आला होता फिर्यादी राहुल प्रफ्फुल बांदेकर यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती सुमारे ४९ लाख रुपयांची रक्कम चोरण्यात आली होती ए टी एम चा पासवर्ड सेफ गार्ड प्रायवेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी एटीएम ऑपरेटर किरण पंडित याला माहिती असल्याने संशयाची सुई त्याच्यावर होती महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातचे नारायण बनकर आणि संभाजी जाधव आणि त्याच्या पथकाने मोठ्या शिताफीने आरोपी किरण पंडित राहणार रामदास वाडी कल्याण पश्चिम, जयदीप पवार (३२) राहणार साई राम वाटिका,खडकपाडा आणि तिसरा आरोपी जुगलकिशोर मिश्रा(३७) या त्रिकुटाला या गुन्हयात अटक केली आहे त्यांच्याकडून ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काही रुपये त्यांनी खर्च केले आहे. पंडित हा पैसे गुंतवणूक करून ग्राहकांना देत असत मात्र लॉक डाउन मध्ये पैसे परत मिळत नसल्याने त्याने एटीएम फोडण्याचे गुन्हा केला आहे आणि इतर आरोपींच्या मदतीने हे कृत्य केले आहे या प्रकरणी तिघांना १२ तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान उपायुक्त विवेक पानसरे यांनी पोलीस अधिकारी अनिल पोवार , प्रकाश पाटील, ,दीपक सरोदे , पोलीस कर्मचारी जयवंत शिंदे, भगवान भोईर , सुनील गांगुर्डे , जितेंद्र चौधरी, विजय भालेराव, संजय जगताप, सचिन माने, दीपक सानप, हनुमंत घुले या पथकाने मोठ्या शितापीने चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.