आत्मभान अभियानाअंतर्गत मुलांसाठी कोरोना जनजागृती संदर्भात व्हिडिओ स्पर्धा

चंद्रपूर – नागरिकांना विशेषत: लहान मुलांना कोरोना विषयक जनजागृती व्हावी तसेच दैनंदिन जीवनात कशा पद्धतीने काळजी घ्यावी व कोरोना नियंत्रण व्हावे यासाठी प्रशासनाने जनजागृती संदर्भात आत्मभान अभियान सुरू केले आहे.आत्मभान अभियानांतर्गत मुलांसाठी व्हिडिओ स्पर्धा येत्या 11 जून पासुन सुरू होत आहे. 11 जून ते 15 जून पर्यंत या स्पर्धेमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

अशी असणार व्हिडिओ स्पर्धा :

कोरोनाविषाणू संदर्भात जनजागृती विषयक विविध व्हिडिओ तयार करून जिल्हा प्रशासनाच्या 9356774681 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा.हा व्हिडिओ पाठवताना व्हिडिओ तयार करणाऱ्यांचे नाव, वय आणि मोबाईल क्रमांकासह व्हाट्सअप करायचा आहे.साधारणत: हाताची स्वच्छता,मास्क लावणे,शारिरीक अंतर,बाहेरगावावरून आल्यानंतर माहिती देणे,प्रशासनाच्या सूचना पाळणे,बाहेर गेल्यावर काळजी घेणे,बाजारात गर्दी न करणे अशा अनेक विषयावर 1 ते 2 मिनिटांचा व्हिडीओ असावा.दोन मिनिटांपेक्षा अधिक नसावा.

या स्पर्धेमध्ये 3 ते 6 वर्ष, 7 ते 12 वर्ष, 13 ते 17 वर्ष या तीन वयोगटातील मुलांना सहभागी होता येणार आहे.आलेल्या व्हिडीओमधून तीन व्हिडिओची निवड करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक तसेच प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहेत.

अधिक माहितीसाठी District Corona Control Cell या फेसबुक पेजला,@collectorchanda या ट्विटर हॅन्डलला व collector.chanda या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त 3 ते 6 वर्ष, 7 ते 12 वर्ष, 13 ते 17 वर्ष या तीन वयोगटातील मुलांनी सहभागी होऊन आत्मभान अभियानांतर्गत कोरोना विषयी जनजागृती करावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web