देशात आणि राज्यात राजकीय नेतृत्व नाही, ई पासेस दोन दिवसात रद्द करावा – प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी.

पुणे – देशामध्ये राजकीय नेतृत्व नसल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा राजकीय नेतृत्व दाखविता आले नाही. महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व दाखवले नसल्याची परिस्थिती आहे. देशात लॉक डाऊन संपविण्याच्या मार्गावर आहे. देशातील कंपन्या चालू करणार मात्र त्यातील कामगार पोसणार कसा, याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.

लॉकडाऊन मुळे बंद असलेल्या कंपन्या चालू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र या कंपन्यांमध्ये काम करणारा कामगार, अधिकारी यांना पोसणार कसे, मालक कसा पोसणार याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही. फिजिकल डिस्टन्स पाहिजे म्हणून सार्वजनिक वाहतूक बंद ठेवणे योग्य आहे. पण ज्या कंपन्यांच्या मालकांकडे गाड्या आहेत, अशा मालकांना गाडी बाहेर काढण्याची परवानगी देण्यात यावी, त्यांना ई पासेसची सक्ती करू नये, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

उद्योग क्षेत्राला स्वतःच्या पायावरती उभे करायचे असेल तर उद्योग क्षेत्रातील माणसाला मुबलकता आणि कामानिमित्त फिरण्याची परवानगी दिली पाहिजे, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीगत गाड्यांसाठी ई पासेसचा आदेश काढला आहे, तो ताबडतोब रद्द करावा आणि त्यांना काम करण्याची संधी द्यावी, जेणेकरून महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आणि मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, त्याची गती पुन्हा चालू होईल, अशी अपेक्षा असून येत्या दोन दिवसात ई पासेसचा आदेश रद्द करावा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web