पीपीई किट आता मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा पुढाकार

प्रतिनिधी.

चंद्रपूर – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून आता पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नितीन मोहीते व सहाय्यक आयुक्त औषधी,अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर पी. एम बल्लाळ यांनी दिली आहे.

मजबूत पुरवठा साखळी विकसित होईपर्यंत विक्रेत्यांशी, निर्मात्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभाग हे काम बघणार आहे.

सध्या चांडक मेडिकलच्या 6 वेगवेगळ्या दुकानात पीपीई किट उपलब्ध आहेत. यासंदर्भात ऑर्डर दिल्यास 10 मिनिटात ती उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते. बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर यासारख्या प्रमुख तालुक्यात एका दुकानात पीपीई किट उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर विक्रेत्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
सामान्य नागरिकांना पीपीई किट उपलब्ध होणार नसून फक्त जिल्ह्यातील डॉक्टर, नर्सेस, खाजगी दवाखाने, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाच्या काळात पीपीई किट गरजेची आहे. त्यामुळे आता पीपीई किट सहज उपलब्ध होणार आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web