काही तासातच बाळासाहेबांचे शब्द खरे ठरले, ३० जून पर्यंत लॉकडाऊन

प्रतिनिधी.

मुंबई – इंटरनॅशनल मॉनिटर फंडमुळे देशातील लॉक डाऊन वाढवण्यात येत असेल तर त्याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा. ३० जून पर्यंत लॉकडाऊन नाही वाढविला तर भारताला आय. एम. एफ. कडून फंड मिळणार नसल्याचे सांगण्यात आले होते, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. काही तासातच त्यांचे शब्द खरे ठरले.

आय. एम. एफ. अर्थात इंटरनॅशनल मॉनिटर फंडमुळे देशातील लॉकडाऊन वाढवण्यात येत असेल तर याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. शिवाय ३० जून पर्यंत लॉकडाऊन नाही वाढवले तर आय. एम. एफ.फंड भारताला मिळणार नाही. त्यामुळे ३० जून पर्यंत लॉक डाऊन वाढवला जाईल, असे संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिले होते. त्यांचे हे शब्द खरे ठरले. पाचवा लॉकडाऊन काही अटीवर ३० जून पर्यंत वाढविण्यात आला आहे.

   
Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web