कल्याण मन पिळवटून टाकणारी घटना; ३ वर्षांच्या चिमुरड्यासह गर्भवतीने कळवा ते कल्याण अंतर रेल्वे ट्रेक वरून चालत गाठले

प्रतिनिधी .

कल्याण – कल्याणातील ८ महिन्यांच्या एका गर्भवती महिलेने ३ वर्षांच्या चिमुरड्यासह कळवा ते कल्याण हे अंतर रेल्वे ट्रॅकवरून चालत गाठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्याने शासकीय यंत्रणा आणिआरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.
कल्याणच्या कचोरे येथील रमाबाई आंबेडकर नगर येथे भागात राहणारी शबा शेख नावाची महिला ८ महिन्यांची गर्भवती होती . प्रसूतीसाठी ती सुरुवातीला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णलयात गेली होती. मात्र प्रसूती काळात काही आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यायोग्य सुविधा नसल्याने तिला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलयात जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार रुख्मिणीबाई रुग्णालयाने रुग्णवाहिकेद्वारे तिला कळवा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याठिकाणी तिची प्राथमिक तपासणीसाठी तीला एक दिवस रुग्णलयात ठेवण्यात आले प्रस्तुती साठी तीला वेळ असल्याने दुसऱ्या दिवशी तीला परत जाण्याचा सल्ला देण्यात आला आणि सकाळी डीचार्ज देण्यात आले .तसेच अशा परिस्थितीत आपण परत कसे जाणार आपल्यासाठी रुग्णवाहिका किंवा वाहनाची व्यवस्था करण्याची या महिलेने मागणीही केली. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यावर या महिलेने तिकडे उपस्थित पोलिसांनाही मदतीसाठी साकडे घातले परंतु त्यांच्याकडूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही
त्यामुळे अखेर नाईलजास्तव ही गर्भवती महिलेने रेल्वे ट्रेकवरून चालत कल्याणला येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आपल्या ३ वर्षांच्या चिमुरड्याला घेऊन या महिलेने कळवा ते कल्याण एवढे मोठे अंतर अवघडलेल्या स्थितीत चालत पार केले.मन पिळवटून टाकणारी घटना आहे कोरोना महामारीत खरंच महिला वर्ग आणि जनरल रुग्णाची हेळसांड सुरू च आहे या हृदयद्रावक प्रकारामुळे शासनाच्या आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. त्यामुळे कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान कल्याण मधील डॉ आहिरे यांनी निश्ल्क उपचार करून महिलेची प्रसूती केली त्यामुळे सर्वच स्थरातून कौतुक केले जात आहे .

त्याच बरोबर प्रत्येक आई हि हिरकणी असतेच हा प्रतेय सुद्धा या घटने मुळे कल्याणकरना आला आहे .

ReplyReply to allForward
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web