पैश्याच्या वादातून आंबिवली मध्ये दुसऱ्या पत्नीची गळा दाबून केली हत्या; हत्यानंतर आरोपी गजाआड

प्रतिनिधी .

कल्याण – कोरोना महामारीत टाळे बंदी असल्याने अत्यावश्य सेवा व्यतिरिक्त सर्वच उद्योग धंदे , रोजगार पूर्ण ठप्प झाले आहे याचं विवेचनातून घरात नेहमीच खटके उडत असल्याने त्याचे पुनवर्सन हाणामारीत होत आंबिवली मधील तिपन्ना नगर मध्ये नवऱ्याने पत्नी चा गळा दाबून  हत्या केल्याचा प्रकार झाला आहे .शुक्रवारी ता २९ , रोजी या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल झाला आहे  दोन बायका आणि फजिती ऐका ” या म्हणी प्रमाणे घरात कलह होत होता त्याचे भांडण इतके विकोप्याला गेले की  नवऱ्याने दुसऱ्या पत्नीची  दाबून हत्या केल्याची घटना आंबिवली परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पती बाळू खरात (४५) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तिपन्नानगर परिसरात राहणारा बाळू भंगार विक्रेता आहे. दोन लग्न केलेल्या बाळूचे दुसरी पत्नी शालन हिच्यासोबत पैशावरुन नेहमी भांडण होत होते. दारुच्या नशेत बाळू नेहमीच तिला मारहाण करत होता. शुक्रवारी रात्रीसुध्दा दारुच्या नशेत असलेल्या बाळूचे शालनसोबत भांडण झाले. याच भांडणातून बाळूने मालनची गळा दाबून हत्या केल्याची माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली. दरम्यान आरोपी बाळू खरात याला अटक केली आहे घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web