कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट

प्रतिनिधी .

कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी डोंबिवलीतील प्रतिक तिरोडकर या तरुणाने रोबोट तयार केला आहे. शुक्रवारी हा रोबोट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनिता राणे यांच्यासह पालिका अधिकाऱ्यांना रोबो चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी खासदार शिंदे यांनी या कठीण काळात प्रतीक याने रोबो बनवून आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉकटर, वार्ड बॉय, नर्सेस सह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.
             डोंबिवलीकर तरुण प्रतिक तिरोडकर याने बनवलेला हा कोरो- रोबोट इंटरनेट च्या माध्यमातून वायरलेस नियंत्रित केला जाऊ शकतो. या रोबोटद्वारे कोरोना रुग्णांना अन्नाची पाकिटे व औषधे पोचविण्यासाठी आणि सुरक्षित अंतर राखण्यासाठी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून अशा रोबोटचा वापर केला जाऊ शकतो. रोबोटमध्ये एक डिस्प्ले स्क्रीन, कॅमेरा आणि एक स्पीकरदेखील सुसज्ज करण्यात आला आहे. तसेच या रोबोट मध्ये सॅनिटायझर चे व्यवस्था देखील करण्यात आली आहे. चार तासांच्या चार्जिंगनंतर हा रोबो सहा ते आठ तास चालू शकतो. हा रोबोट इंटरनेटच्या माध्यमातून ऑपरेट केला जात असल्याने या रोबोट ला अंतराचे बंधन नाही. एकूणच हा रोबोट आज पासुन पालिकेच्या सेवेत दाखल झाला असून शनिवार पासून  कोरोना रुग्णाची सेवा करणार आहे.दरम्यान प्रतिक याच्या कार्याचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी , महापौर विनिता राणे आणि कल्याण खासदार श्रीकांत शिंदे यांनी  शब्दसुमनांनी कौतुक गेले .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web