जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिके

प्रतिनिधी .

कोल्हापूर – पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत पूर व्यवस्थापनासाठी उपलब्ध असणाऱ्या साधनसामग्रीची चाचणी प्रात्यक्षिके पंचगंगा नदी घाटावर आज करण्यात आली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शीतल मुळे-भामरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत काम करणारे करवीर, भुदरगड, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील स्वयंसेवक तसेच आपदामित्र व आपदा सखी उपस्थित होते.
प्रात्यक्षिकांमध्ये जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असणाऱ्या तीन टेबल रबर बूट, तीन मशीन लाईफ जॅकेट लाईव्ह, त्याचबरोबर इमर्जन्सी लाईट रोप इत्यादी साहित्याच्या मदतीने उपस्थित असणाऱ्या या सर्व स्वयंसेवकांना प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पाण्यात पडलेल्या व्यक्तीला बोटीच्या सहाय्याने बोट नसेल तर दोरीच्या साह्याने कशा पद्धतीने या पाण्याच्या बाहेर काढायचे, त्याला प्रथम उपचार कसे द्यायचे, त्याला वेगळ्या पद्धतीच्या चरणी वाहून कसे घेऊन जायचं, वैद्यकीय उपचार कसे द्यायचे इत्यादी बाबींची प्रात्यक्षिकही स्वयंसेवकांना देण्यात आली. त्याचबरोबर या सर्व स्वयंसेवकांकडून सरावही करून घेण्यात आला.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web