प्रतिनिधी.
कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३१ नवीन कोरोना बांधित रुग्णांची भर पडली आहे. त्यात दोन लहानग्यांचा समावेश आहे . कल्याण पूर्वेत इतर परिसरपेक्षा झपाट्याने कोरोना लागण रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी ता .२९ रोजी केडीएमसी क्षेत्रात ३१ कोरोना बांधित रुग्ण आढळले आहे बांधकाम विषयी कुठलेही नियोजन नसलेल्या परिसर कल्याण पूर्वेत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्ण १७ आढळून आल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे . हा परिसर अस्तव्यस्त पसरलेल्या चाळी, अनधिकृत इमारती , आरसीसी पोटमाळे, आरक्षित भुंखडावर राजरोसपणे होणारी कामे, त्यामुळे दाटीवटीचे परिसर आहे परिणामी कोरोना रुग्णाची संख्या सर्वात जास्त आहे तब्बल २५० रुग्ण या भागातील आहेत पालिका प्रशासनाने या भागात एक तात्पुरित्या स्वरूपात कोरोना रुग्णालय उभारण्याची मागणी होऊ लागली आहे .
कल्याण पूर्वेतील- १७, परिसरकाटेमानिवली, आनंदवाडी, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, लोकधारा, तिसगाव, नेतिवली, जरीमरी मंदिराजवळ, चक्कीनाका, कल्याण पश्चिमेतील- ७,परिसर भारताचार्य चौक, मिलिंद नगर, वायलेनगर, छत्री बंगल्या जवळ, ठाणगेवाडी, गांधारी,
डोंबिवली पूर्वेतील -४, परिसर ,पाथर्ली गाव, नांदिवली रोड, गणेश नगर, सावरकर रोड, डोंबिवली पश्चिमेतील दिनदयाल क्रॉस रोड, शास्त्री नगर, ठाकुर्लीतील खंबाळपाडा या परिसरातील आहेत. १९ पुरुष तर ९ महिला, १ बालक आणि २ बालिकांचा समावेश आहे.
दरम्यान या ३१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ९४२ झाली आहे. यापैकी आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून ३२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजमितीस तब्बल ५८९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.