पंडित नेहरुंनी रचलेल्या भक्कम पायावरच आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा- उपमुख्यमंत्री

प्रतिनिधी.

मुंबई – देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा हा पंडितजींनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर खंबीरपणे उभा आहे, याचं स्मरण करुन मी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत पंडितजींचं अमूल्य योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी  त्यांच्या कुटुंबानं केलेला त्याग, स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत त्यांनी दिलेलं योगदान देशवासियांच्या चिरंतन स्मरणात राहणार आहे. पंडितजींनी उभारलेल्या शैक्षणिक, संशोधन संस्था, पायाभूत प्रकल्पांचा रचलेला पाया, युवकांच्या नेतृत्वविकासाला दिलेली दिशा, लोकशाही रुजवण्यासाठी, भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न हे सारं अलौकिक आहे.

पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा हा पंडितजींनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर खंबीरपणे उभा आहे, याचं स्मरण करुन मी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web