कोरोना चाचणीसाठी पालिका शुल्क आकारत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे घरात निषेध आंदोलन

प्रतिनिधी .

डोंबिवली – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यादिवसात सर्वांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ही वास्तविकता पालिका प्रशासनाला माहिती असूनही कोरोना चाचणीसाठी शुल्क आकारले जात आहे असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालिकेचा निषेध करत घरात निषेध आंदोलन केले.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांकडून अवाजवी पैसे न घेता कोरोना चाचणी शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय मध्ये मोफत करावी या मागणीसाठी डोंबिवलीत करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळपासून घरात पालिकेच्या निषेधार्थ फलक घेऊन आंदोलन केले.याबाबत कल्याण-डोंबिवली कल्याण-डोंबिवली जिल्हा संघटक मिलिंद साळवे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अपयशी ठरलेल्या राज्यातील सत्ताधाऱ्यांचा, केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा, केडीएमसी प्रशासनाच्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने एक दिवसीय उपोषणास सुरुवात केली.कोरोना चाचणी सर्व नागरिकांना मोफत झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. याआधी कल्याण – डोंबिवली महानगरपालिका प्रशासन कोरोना चाचणीसाठी ३००० रुपये शुल्क आकारत असल्याचे सांगत शिवसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.दरम्यान वंचित बहुजन आघाडीने गोरगरिबांसाठी केलेल्या या आंदोलनाची दखल पालिका प्रशासन , सत्ताधारी पक्ष घेतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web