व्यवसाय करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण ,वडवली मधील प्रकार; खडक पाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी .

कल्याण – कल्याण पश्चिमेतील खडक पाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वडवली गावात पैश्याच्या व्यवहारातून बाचाबाची होऊन जोरदार हाणामारी झाली  वडवली परिसरात राहणारा भुषण भोईर (१९) जिवंत बॉयलर कोंबडी सप्लायचा व्यवसाय करतो. सोमवारी रात्री ८.१५ च्या सुमारास भुषण आंबिवली येथील मार्केटमध्ये सप्लाय केलेल्या कोंबड्यांच्या कलेक्शनसाठी गेला होता. यावेळी, त्याठिकाणी आलेल्या अविनाश पाटील (३५, रा. वडवली) याने जिवंत बॉयलर कोंबडीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी भुषणकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी, धंदा व्यवस्थित सुरु नसल्याने पैसे नसल्याचे भुषणने अविनाशला सांगितले. याच रागातून अविनाशने भुषणला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी, घाबरुन पळून जाणा-या भुषणवर अविनाशने कोणत्यातरी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात भुषण जखमी झाला आहे.

          वडवली  राहणारा राहुल भंडारी (३०) सोमवारी रात्री १० च्या सुमारास आपल्या दिवेश पाटील या मित्राला भेटून घराच्या दिशेने जात होता. यावेळी, याच परिसरात राहणा-या विलास भोईरने दिवेश हा आमचा दुश्मन आहे, तू त्याचे घरी यायचे नाही असे बोलून राहुलसह त्याच्या आईवडिलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. राहुलच्या घरावर दगडफेक करत घराच्या खिडकीची काच फोडून नुकसान केले. तसेच, कुणाल म्हात्रे, राहुल पाटील, विलास भोईर, अनिकेत भोईर यांनी राहुलच्या घरात घुसून संगणक आणि मोबाईल फोडून नुकसान केले. तर राहुल पाटील आणि कुणालने रिव्हॉल्वरसारखे दिसणारे हत्यार दाखवत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचे राहुलने खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.दरम्यान नागरिकांना कोरोना सारख्या महामारी चे गांभीर्य राहिलेले नाही यावरून दिसून येत आहे .रागावरचेनियंत्रण सुटल्यावर मनुष्याला कुठल्याच ही स्थराला पोहचतो आणि आवती भोवती काय परिस्थिती आहे याची जाण राहत नाही .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web