डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचा उपक्रम मंगळवारी (दि.२६)राज्यस्तरीय ऑनलाईन कापूस कार्यशाळा

प्रतिनिधी .

अकोला – येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या वतीने मंगळवार दि.२६ रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन कापूस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाव्दारे मंगळवार दि. २६ रोजी सकाळी साडेदहा वाजता ही ‘ऑनलाईन कापूस कार्यशाळा’ झूम मिटींग सॉफ्टवेअर च्या माध्यमातून करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे कृषि मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले हे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्याचे कृषि आयुक्त डॉ. सुहास दिवसे (भा.प्र.से.), संचालक, अटारी, पुणे डॉ. लाखन सिंग यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या वेळी डॉ. दिलीप मानकर,डॉ. प्रदिप इंगोले, डॉ. विलास खर्चे, डॉ. शरद गडाख, डॉ. देवराव देवसरकर, सुभाष नागरे यांचीही उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, विस्तार शिक्षणचे डॉ. प्रमोद वाकळे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. नारायण काळे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.विनोद खडसे यांनी केले आहे.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
https://zoom.us/webinar/register/WN_bkGF_oy8Tpm6byj2Esm4fw
या लिंकवर नोंदणी केल्यानंतर आपल्या ईमेलवर लिंक प्राप्त होईल ज्याव्दारे कार्यशाळेत सहभागी होता येईल.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web