साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने 1 हजार 104 कामगार बिहारकडे रवाना

प्रतिनिधी .

शिर्डी – कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि कोपरगांव तालुक्यातील बिहार राज्यातील 1 हजार 104 कामगार व त्यांचे कुटुंबिय साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने बिहारकडे रवाना झाले. यामध्ये राहाता व पिंप्री निर्मळ येथे शिक्षण घेणाऱ्या 86 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या कामगारांचा स्वगृही परतण्याचा खर्च राज्य शासनाने केला असून रेल्वे प्रवासाप्रित्यर्थ एकूण 7 लाख 72 हजार 920 एवढे भाडे अदा केले. रोजगारानिमित्त हे सर्व जण या तालुक्यांत वास्तव्यास होते. साईनगर शिर्डी येथून पहाटे ही रेल्वे मार्गस्थ झाली. प्रशासनातर्फे सोडण्यात आलेली ही पाचवी श्रमिक रेल्वे असून परप्रांतीय कामगारांना बिहारकडे नेणारी पहिलीच रेल्वे होती.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web