प्रतिनिधी .
बीड दि.२२ – जिल्ह्यातील नागरीकांनी पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी, ट्रक चालक, क्लिनर व इतर अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांना त्यांच्या गावात येण्यासाठी ग्रामस्थांनी मज्जाव करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व वरील संबंधित व्यक्तींचे कामाचे स्वरूप पाहता त्या सर्वांना होम क्वाॅरंटाईन करणे शक्य होणार नाही परंतु हे कर्मचारी त्यांचा गावात किंवा राहण्याच्या ठिकाणी गेल्यास त्यांनी स्वतः सर्व कोरोना संसर्ग सुरक्षेचे (covid19) नियम पाळावेत अशाही सूचना ही जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.