पुणे स्मार्ट सिटी वाॕर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

प्रतिनिधी.

पुणे,दि.२२-पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वाॕर रुम ( डॕश बोर्ड) प्रणालीची कार्यपद्धती उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार जाणून घेतली व उपयुक्त सूचना केल्या.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने ही प्रणाली विकसित केली आहे.याठिकाणी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली आहे.कोरोनबाधित रुग्ण,शहरातील कोरोनाबाधित क्षेत्र,वाढत असलेला परिसर याबाबतची अद्यावत माहिती याठिकाणी मिळते.त्यामुळे उपाययोजना करणे सोपे जाते.अगदी सुरूवातीपासूनची माहिती याठिकाणी मिळू शकते,अशी माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी दिली.
अपर आयुक्त रुबल अग्रवाल अधिक माहिती देताना म्हणाल्या,याठिकाणी निरंतर काम चालू असते.शिवाय बेडची उपलब्धता,भविष्यात लागणारे बेडस् ,डाॕक्टरांची संख्या या डॕश बोर्डवर पाहायले मिळते,त्यामुळे तात्काळ कार्यवाही करणे सोपे जाते.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,जिल्हाधिकारी नवल किशोर राम ,अपर आयुक्त शांतानु गोयल,आरोग्य प्रमुख डाॕ.रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते.
उप मुख्यमंत्री अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले,ही प्रणाली उत्तम आहे.एखाद्या कोरोनाबाधित नागरिकांचा फोन आला तर तत्काळ रुग्णवाहिका पोहचली पाहिजे.भविष्याच्या दृष्टिकोनातून बालेवाडी प्रमाणे अन्य ठिकाणी कोव्हिड सेंटर कार्यान्वित केले पाहिजे.
यावेळी त्यांनी पहिला रुग्ण बरा झाल्यानंतर पुन्हा त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लागण झाली काय,यावर आयुक्तांनी तसे झाले नाही.आपण त्यांच्या सतत संपर्कात असतो.रोज चार ते साडेचार हजार लोकांना फोन केला जातो,असे सांगितले.डाॕक्टर,रुग्ण वाहिकांची उपलब्धता याबाबतची माहिती घेताना निधी लागत असेल तर मागणी करा,लगेच उपलब्ध करून देता येईल,असे उप मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web