रायगड मधून आसामला निघाली २९ मजुराची सायकल वारी सरकार कडे मदतीसाठी हाक

प्रतिनिधी.
कसारा – करोनाने सगळी कडे हाहाकर माजवला आहे. देशभर लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे खूप प्रश्न निर्माण झाले आहे. सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे हातावर पोट भरणाऱ्या परराज्यातून आलेल्या मजुराचा हे मजूर आपल्या व आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. करोनामुळे सर्व उद्योग धंदे बंद पडले आहे त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आहे. आसाच एक २९ मजुराच्या ग्रुप आसाम मधून रायगड येथील नशनल डिझाईनर डिस्प्ले या फर्निचर च्या कंपनी मध्ये लोडिंग आणि पंकिंग चे काम करत होता. लॉकडाऊन मुळे काम बंद झाले व उपासमारीची वेळ त्याच्या वर आली. नोकरी गेल्यामुळे आता आमच्याकडे खाण्यापिण्यासाठी पैसे नाही,घरभाडे भरण्यासाठी पैसे नाही म्हणून आता घरी जाण्याचा निर्णय आम्हाला घावा लागलाय असे ते मजूर सागतात. दुसरा कोणताच मार्ग नसल्यामुळे प्रवासासाठी साधनही उपलब्ध न झाल्यामुळे शेवटी २९ मजुरांनी रायगड मधील पेन वरून आसामला सायकल चालवत जाण्याचा निर्णय घेतला. व २८०० किलोमीटर असलेल्या आसाम प्रवासाला ते निघाले आहे. अडीच दिवसात ते कसारा घाटा पर्येंत पोहचले आहे. एका दिवसाला हे लोग ९० किलोमीटर चे अंतर कापायचे व नंतर मिळेल तिथे आराम करून पुढे निघायचे असे त्यांनी ठरविले आहे. जर आसाच प्रवास राहिला तर ते ३० दिवसात आसाम ला पोहचतील अशी आशा या मजुरांना वाटते. सरकार ने आम्हाला काही मद्दत करावी अशी आमची सरकार ला विनंती आहे असे ते मजुर बोलतात.
मे महिन्यात रखरखत्या उन्हात हे २९ मजुर कसलीही पर्वा न करता आपल्या घरी पोहचण्यासाठी २८००किमी प्रवास तो हि सायकल वर करून पोहतील कि नाही हि एक शंकाच आहे. असाच एक मजूरांचा ग्रुप घर जाण्याच्या प्रवासाच्या वेळी औरंगाबाद जवळ निघाला असता रेल्वे रुळावर त्याच्यासोबत अपघात झाला होता व त्या मध्ये १६ मजूर मृत्यूमुखी पडले होते. आता हेही मजुर एवढ्या मोठ्या प्रवासाला निघाले आहे. त्यामुळे सरकार ने यांना वेळीच गाढून त्याच्या घरवापसीची व्यवस्था करावी जेणे करून ते आपली घरी सुखरूप पोहचतील.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web