वाशी एक्सिबिशन सेंटर मध्ये कोविड रुग्णांसाठी सुविधा -महसूल आयुक्त शिवाजी दौंड

नवी मुंबई – वाशी एक्सिबिशन सेंटर येथे सुमारे 1200 बेड असलेले अत्याधुनिक कोविड सुविधा केंद्र तयार करण्यात येत असून, ते एक आठवडयात कार्यान्वीत होईल. अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त श्री.शिवाजी दौंड यांनी आज दिली.
वाशी येथील एक्सिबिशन सेंटरला श्री.दौंड यांनी आज भेट दिली. यावेळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवीमुंबई आणि परिसरात नव्याने कोविड रुग्ण आणि बाहेरुन येणारे प्रवासी लक्षात घेता नवीन अत्याधुनिक कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या कॅम्पमध्ये रुग्णांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कॅम्पधील वैद्यकीय व्यवस्था WHO (World Health Organisation) कडून ICMR (Indian Council of Medical Research) ला देण्यात आलेल्या मार्गदर्शन सूची प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या कॅम्पमधील बेडची संख्या, ऑक्सीजन व्यवस्था, व्हेंटिलेटर्सची संख्या यानुसार उभारण्यात येत आहे. याकॅम्प मध्ये तज्ञ डॉक्टर, परिचारीका, सहाय्यक यांच्या विशेष पथकाव्दारे रुग्णांची देखभाल केली जाईल. असे श्री. दौंड यांनी यावेळी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web