प्रतिनिधी .
सांगली- करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, पोलीस,सफाई कर्मचारी काम करत आहेत.पण त्यांच्या सोबत शिक्षक ही काम करत आहेत. राज्यभरात प्रत्येक जिल्हा प्रवेशद्वारावर शिक्षक ड्युटी करत आहेत. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे.राज्यातील जिल्हा परिषदेचे हजारो शिक्षक या कामावर नियुक्त आहेत. अनंतपुर चेक पोस्ट येथे नानासाहेब हे काल रात्रपाळी करत होते.जिल्ह्यात प्रवेश करणार वाहन थांबवून त्यातील लोकांच्या शरीराच तापमान तपासण ही त्यांची जबाबदारी होती. यावेळी एक ट्रक भरधाव आला.त्याला थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला.मात्र ट्रक थांबला नाही.ट्रकने कर्तव्यावर असलेल्या नानासाहेब कोरे यांना उडवलं.या घटनेत नानासाहेब यांचा जागीच मृत्यू झाला.नानासाहेब कोरे यांच्या कुटुंबियांना नियमानुसार एक कोटी मदत देण्यात यावी अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे महासचिव गौतम कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून केली आहे.