वंचित बहुजनांचे नेते बाळासाहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबाना धान्य वाटप

 प्रतिनिधी.

कल्याण – कोरोना चा संकट देशात असताना आज गोर गरीब जनतेचे भयंकर हाल होत असल्यामुळे आणि आज बहुजनहृदय सम्राट,स्वाभिमानी, कर्तृत्ववान, खंबीर नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज कल्याण पश्चिम येथे वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्ह्याचे जेष्ठ नेते,कामगार नेते मा बाबूंराव जाधव साहेब ह्यांनी आज 250 गरजू कुटुंबाना रेशन वाटप करण्यात आले. समाजाचे आपण देणं लागतो आणि त्याच समाजासाठी देशासाठी आपण खंबीर पणे आज त्यांच्यासोबत राहून ह्या कठीण काळात त्यांना साथ देऊन होईल ते सहकार्य करावे.

इंदिरा नगर, तावरीपाडा, न्यूइंदिरा नगर (गौरीपाडा) येथील लोकांना घरो घरी जाऊन धान्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी आमचे मित्र विकास वानखेडे (समाजसेवक) तसेच अजय माणिक सावंत ह्यांनी पूर्ण वेळ देऊन आम्हाला मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला ठाणे जिल्हा रिपब्लिकन सेने चे जिल्हा अध्यक्ष थॉमस सर शिंगारे, वंचित बहुजन आघाडीचे कल्याण शहरातील सतीश जगताप,भैय्यासाहेब गायकवाड, किशोर गायकवाड, बळीराम जगताप, अनिल गायकवाड, आणि इतर बरेच कार्यकर्ते उपस्तीत होते. ह्या कठीण काळात देखील सर्व कार्यकर्ते उपस्तीत राहिले त्यांचे आभार.

बाबासाहेबानी आपल्याला आपल्या कमाई मधील हिस्सा समाजासाठी देण्यास शिकवण दिली आहे तसेच त्यांचे नातू बाळासाहेब ह्यांनी तेजोमय प्रकाशासारखे स्वाभिमानी आपल्यास घडवले आहे म्हणूनच आपण देखील स्वाभिमानी सप्ताह म्हणून आपल्या विभागातील गरीब गरजू कुटुंबाना होईल ती मदत करावी आणि ह्या कठीण परिस्तिथी मध्ये देशासोबत उभे राहावे.सर्वांनी आपली जवाबदारी नक्कीच physical distancing च पालन करूनच आपले कार्य करावे तसेच ठाणे जिल्हा मध्ये गोर गरीब कुटुंबांनी अडचण असल्यास आम्हाला नक्की संपर्क करावा आम्ही होईल ती मदत नक्कीच करू असे राहुल बाबुराव जाधव यांनी सागितले

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web