बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अकोला येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाला वंबआ च्या वतीने १०० पीपीई भेट

प्रतिनिधी .

अकोला:- दि १० – एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने वंचित बहूजन आघाडी अकोला जिल्हाच्या वतीने आज ‘स्वाभिमान सप्ताहा अंतर्गत’ १०० पीपीई किट अकोला येथील  जिल्हा सामान्य रूग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देण्यात आल्या.

ह्यावेळी प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरूंधतीताई सिरसाट, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी ह्या पीपीई किट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनचे डॉ पावळे, डॉ. सिरसाम, डॉ. च-हाटे यांनी स्विकारले.

ह्या वेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने,सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी, सभापती आकाश सिरसाट, सभापती पंजाबराव वडाळ, महानगर अध्यक्ष शंकर इंगळे, गटनेता ज्ञानेश्वर सुलताने,सम्यक जिल्हाध्यक्ष राजकुमार दामोदर, मनोहर पंजवानी,सचिन शिराळे, बुध्दरत्न इंगोले, रणजित वाघ,नितेश किर्तक, शेख साबीर,मनोहर बन्सोड,जय रामा तायडे,गजानन दांडगे, पराग गवई, नितीन सपकाळ प्रामुख्याने उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी सभापती पांडे गुरूजी यांच्या सहकार्याने जयदिप पळसपगार व कार्यकर्ते यांनी ऊपरी येथे ३०० गरजू नागरिकांना धान्य किटचे वाटप करण्यात आले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web