प्रतिनिधी.
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात यांची विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली यावेळी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर, जयंत पाटील, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील आदी नेते उपस्थित होते.सर्व नेत्यांनी राज्य सरकार ला वेगवेगळ्या सूचना केल्या त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला पुढील प्रमाणे सुचना केल्या.
लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं. लॉकडाऊन बंद केला, त्यामुळे संध्याकाळच्या फ्लाईटने कोरोना जाणार नाही. लस येईपर्यंत कोरोना जाऊ शकत नाही.
परप्रांतीय कामगारांना परत आल्यावर तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये. कारण त्या राज्यात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे चाचण्या होत आहे. तिकडे काय चाललंय हे आपल्याला माहिती नाही. ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रातून गेले आहेत. ते जेव्हा परत येतील किंवा आणले जातील त्यांची तपासणी केल्याशिवाय आत घेऊ नये. तसेच त्याच वेळी त्यांची ‘राज्य स्थलांतरित कायद्या’ खाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. कारण आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो.
महाराष्ट्रातील कारखाने उद्योग बंद होऊ नयेत, म्हणून राज्यातील तरुण तरुणींना ज्या ठिकाणी रोजगार उपलब्ध आहेत त्याची माहिती द्यावी. आपल्याकडे विदर्भ मराठवाडा याठिकाणी त्यांना रोजगाराविषयी माहिती नसते. छोटे दवाखाने सुरु करावेत. आजारी पडल्यानंतर दाखवायचं कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी एखादा पोलीस असावा. कारण रांगा लागतील तेव्हा नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस असावा .गेले दीड महिना पोलीस थकले आहेत, तेही प्रचंड तणावाखालून गेले आहेत. काही ठिकाणी पोलिसांना गृहीत धरलं जात आहे. अशा ठिकाणी एसआरपीएफ तैनात करावे. त्यामुळे दरारा निर्माण होईल. जेणेकरुन लोक बाहेर येणार नाहीत. सरकारी कर्मचारी, पोलीस ते सफाई कामगार अशा अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या सर्वांच्या सुरक्षेची काळजी घ्या. सफाई कामगार आजारी पडत आहेत, त्यांनी हात वर केले, तर शहरांची अवस्था काय होईळ? त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्या. रमझानची वेळ सुरु आहे. अनेक ठिकाणी गर्दी होते. लोक बाहेर पडतात. अनेक सण घरात राहून साजरे केले. त्यामुळे मुस्लिम समाजानेही त्याचा विचार करावा. जर विचार होत नसेल तर या ठिकाणी अधिक फोर्स लावणे गरजेचे आहे. जेणेकरुन या गोष्टी बंद होतील. स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना घरी जाण्यासाठी किंवा जे लोक हॉस्टेलमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यासाठी काही व्यवस्था करता येईल ती करावी शाळा कशाप्रकारे सुरु करणार. ई लर्निंग वगैरे प्रत्येक ठिकाणी शक्य नाही. शहरातही अनेक ठिकाणी अशक्य आहे. ती बाब पालकांपर्यंत पोहोचवणं. आशा वेगवेगळ्या बाबीवर राज ठाकरे यांनी सरकार चे लक्ष्य वेधले.