मुंबई – कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनच्या वुहान शहारात उभारण्यात आलेल्या कोविड१९ रुग्णालयाच्या धर्तीवर राज्य सरकार वतीने मुंबई येथील BKC संकुलात युद्धपातळीवर उभारण्यात येणाऱ्या १००० खाटांची क्षमता असलेल्या कोविड१९ रुग्णालयाच्या कामाला मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी भेट दिली.
येत्या १५ दिवसांत या सर्व वैद्यकीय सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी भेट देत युद्धपातळीवर सुरू असलेल्या या रुग्णालयाच्या कामाची पहाणी केली तसेच सर्व तज्ञ मंडळींसोबत चर्चा केली.
मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशावरून व मार्गदर्शनाखाली हा महत्वाकांक्षी उपक्रम उभारण्यात येत असून #ठाणे येथील ज्युपीटर हाॅस्पिटल व MMRDA यांच्या संयुक्त निदर्शनाखाली या रुग्णालयाची निर्मिती करण्यात येत आहे.