अभिनेता इरफान खान याचं निधन

प्रतिनिधी.

मुंबई – अतिशय गरिबीतून आणि संघर्षातून पुढे आलेला चित्रपट जगात आपला ठसा उमटवणारा बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये आज सकाळी निधन झाले ते ५४ वर्षाचे होते. दीर्घ काळापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाच्या आजाराशी लढत होते. इरफानची प्रकृती अचानक बिघडली असता त्याला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये  दाखल केल्यानंतर आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरु होते. मागील अनेक दिवसांपासून कॅन्सर आजारावर उपचार सुरु होते.

काल त्याची तब्येत अचनाक बिघडली. दोन वर्षांपूर्वी मार्च २०१८ मध्ये इरफानला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याने स्वतः ही धक्कादायक बातमी दिली होती. त्याने ट्विट करत म्हटले होते, “आयुष्यात अचानक काही अशा घटना होतात ज्यामुळे आयुष्य तुम्हाला खूप पुढे घेऊन जातं. माझ्या आयुष्यात मागील काही दिवसांपासून असंच काहीसं घडत आहे. मला न्यूरो एन्डोक्राईन ट्यूमर नावाचा आजार झाला आहे. मात्र, आजुबाजुच्या लोकांच्या प्रेमाने आणि शक्तीने मला नवी आशा मिळाली आहे.इरफान खानने आपल्याला कॅन्सर झाला असल्याचं जाहीर केल्यानंतर त्याने सर्व कामं थांबवून उपचारासाठी लंडनला गेले होते. २०१९ मध्ये परतल्यानंतर इरफानने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊन मुळे ६ एप्रिल रोजी हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला.

इरफान खानने मकबूल, लाइफ इन ए मेट्रो, द लंच बॉक्स, पीकू,तलवार,हिंदी मीडियम, हासिल, पानसिंग तोमर चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांना पानसिंग तोमर’ साठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. कलेच्या क्षेत्रातला देशाचा चौथा सर्वोच्च सन्मान असलेला पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होत. आशा या महान नायकच्या निधनामुळे चित्रपट जगतातील कधी न भरून निघणारी हानी झाली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web