लॉकडाऊनमध्ये खोदली २५ फुट खोल विहीर लोकांपुढे ठेवला नवा आदर्श

प्रतिनिधी.

वाशिम :- कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे.त्यामुळे सरकारने सर्व नागरिकांना घरातच राहा असे आवाहन कले आहे. पण काही अति उतावीळ मंडळी कारण नसताना बाहेर गर्दी करताना दिसत आहे. स्वताचा जीव तर धोक्यात घालत आहेत पण याच्या या आशा गर्दी करण्यामुळे प्रशासना ला हि मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. डॉक्टर ,नर्सेस, पोलीसअत्यावश्यक सेवा देणारे कामगार,पत्रकार स्वताचा जीव धोक्यात घालून कोरोना लढाईत उतरले आहे.पण काही लोक गर्दी करून सरकारला सहकार्य करत नाही.आशा लोकांना घरात बसून वेळेचा सदउपयोग कसा करता येईल हे वाशीम मधल्या एका ग्रामीण भागातील दाम्पत्याने दाखून दिले आहे. वाशीम  जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेडा हे सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. येथील पुष्पा व गजानन पखमोडे दाम्पत्याने केलेल्या एका प्रेरणादायी कामगिरीमुळे हे गाव सध्या चर्चेत आले आहे.

वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पाणीटंचाईची समस्या ही प्रत्येक उन्हाळ्यात प्रखरतेने जाणवते. त्यामुळे पाण्याचे मोल काय असते येथे लहानापासून मोठ्यान पर्येंत सर्वाना माहित आहे. पुष्पा आणि गजानन यांनी सुद्धा हे मोल लक्षात घेवून पाण्याच्या समस्येवर मात करणारी एक अनोखी व इतरांना आदर्श वाटावा अशी कामगिरी करून दाखविली आहे. लॉकडाऊन काळात घराबाहेर जाऊ नये असे आवाहन सरकारने केले आहे.त्याचे पालन करून लॉकडाऊन’च्या २१ दिवसांत या पती-पत्नीने स्वतः खोदकाम करून अंगणात २५ फुट विहीर खोदण्याची कामगिरी करून दाखवली आहे.आता उन्हाळ्यात त्याची पाण्याची चिंता मिटली आहे. आत्मविश्वास आणि जिद्दीने माणूस कोणतेही मोठे काम हे मेहनत व चिकाटीने करू शकतो हे या दाम्पत्याने सिद्ध करून दाखवले आहे. त्याच बरोबर आपण वेळेचा कशा प्रकारे चागला उपयोग करू शकतो हे यांनी दाखून दिले आहे. घरात राहून या ग्रामीण भागातील दाम्पत्याने सरकारला सहकार्य करत इतरना प्रेरणादायी अशी कामगिरी केली आहे आपणही सर्व नागरिकांनी घरात राहून सरकारला कोरोना विरुद्ध लढाईत मद्दत करूयात.   

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web