महाराष्ट्रात लॉकडाऊन किमान ३० एप्रिल पर्यंत कायम,तुम्ही खबरदारी घ्या,आम्ही जबाबदारी घेतो.

प्रतिनिधी.

मुंबई- लॉकडाऊन मुदत १४ एप्रिल २०२० असली तरी कोरोनाचा विषाणू चा प्रादुर्भाव हा दिवसन दिवस वाढत आहे.तो रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत राज्यातील लॉकडाऊन सुरु ठेवण्याची भूमिका राज्याच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली. कोरोना  विषाणूची साखळी तोडणे गरजेचे असून ही साखळी तोडण्यासाठी  जनतेने खबरदारी घावी आम्ही जबाबदारी घेत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.प्रत्येकाने वर्क फ्रॉम होम सुरु करा. पुढील १५ दिवसात लॉकडाऊनमध्ये काय सुरु करायचे काय नाही, किती कामगार कामावर जातील, कारखाने सुरु करण्यासंदर्भात आदी गोष्टींबाबतची तयारी सुरु आहे. ही तयारी पूर्ण झाली की याबाबतची घोषणा १४ एप्रिलपर्यत वेळोवेळी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी फारसे हताश, निराश न होता घरात बसून सरकारला सहकार्य करावे असे आवाहन करत शेतीच्या काम यापूर्वीच सुरु ठेवले होते वा या नंतरही सुरु राहतील असे सांगितले.

जेव्हा जेव्हा संकट आले त्या संकटाचा महाराष्ट्राने न डगमगता  सामना केला आहे. त्याच बरोबर देशाला नव्हे तर जगाला महाराष्ट्राने दिशा दाखविली आहे. त्यामुळे या संकटाचा सामना आपण असाच पुढे सुरु ठेवून कोरोनाला हरवू असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. कोरोनावर मला पक्षीय राजकारण नको आहे.आज पंतप्रधानान बरोबर देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्याची   व्हिडीओ काँन्फरन्स झाली. आज केंद्राबरोबर राज्य सरकार आहे, प्रत्येक राज्याबरोबर केंद्र सरकार आहे. त्यामुळे याप्रश्नांवरून कोणीही पक्षीय राजकारण करू नये,राजकारण करायला नंतर खूप वेळ आहे आपल्याकडे असेही ते बोलले. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. हे युद्ध आपण जिंकून दाखवणारच या निश्चयाने हे युद्ध लढायचं आहे असे आवाहन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web