जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आदेश.

प्रतिनिधी.

ठाणे दि.१०: नागरिकांनी, अत्यावश्यक व जीवनाश्यक सेवेतील सर्व कर्मचारी, मालवाहतुकदार यांनी मास्क वापरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.ठाणे जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोहिड-१९ विषाणूचा संसर्ग व प्रादूभाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरतांना फिरतांना खालील प्रमाणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी जसे रस्ते, हॉस्पीटल, ऑफिस, बाजार इ. ठिकाणी फिरत असतांना चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य राहील,कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वाहनातून फिरत असतांना चेहऱ्यावर वर नमूद केल्याप्रमाणे मास्क लावणे अनिवार्य राहिल.

वर नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीने, अधिकाऱ्याने कार्यालयात, कामाच्या ठिकाणी व इतर ठिकाणी तसेच बैठकीमध्ये उपस्थित राहतांना चेह-यावर मास्क लावणे अनिवार्य राहिल.असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
सदरचे मास्क हे प्रमाणित दर्जाचे औषधालयातून विकत घेतलेले किंवा घरी तयार केलेले धुण्या योग्य व धुतल्यानंतर निर्जतुकीकरण करुन वापरु शकतील असे असावे
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शविल्यास संबंधितां विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१(b), भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहील असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web