भिवंडीत लॉकडाऊन काळात नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसाची ड्रोनद्रारे नजर.

   प्रतिनिधी. भिवंडी- कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. प्रशासन आपल्या परीने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्त्न करीत आहे. कोरोना टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. डॉक्टर,नर्स त्याच प्रमाणे आत्यावाश्क सेवा देणारे कर्मचारी व पोलिस दल दिवस रात्र करोनाशी मुकाबला करत आहे. पोलिस कर्मचारी लोकांना रस्त्यावर विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन करीत आहे, त्याच प्रमाणे शासनाने घालून दिलेले नियमाचे पालन करा हेही सांगत आहे. हे सर्व कर्मचारी फक्त सामान्य नागरिकाचा कोरोना पासून बचाव व्हावा यासाठी तडफड करत आहे. पण काही नागरिक हे कोरोना सारखे मोठे संकट थट्टावारी नेत आहे. आणि कितेक वेळा बजावून सुद्धा कारण नसताना आपली वाहने घेऊन रत्यावर गर्दी करीत आहे. आणि लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करत आहे,आणि कोरोनाचे संकट ओढवून घेत आहे.

अशा नागरिकाचा बंदोबस्त करण्यासाठी भिवंडी पोलिस सज्ज झाले आहे. आता अशा नागरिकांन वर ड्रोनच्या सहय्याने नजर ठेवली जाणार आहे. ड्रोनद्रारे रेकी करून,स्कनिंग करून तिथे पोलिस मार्शल पोहचतील,नियमाचे उल्लघन करताना दिसतील त्याचावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.असे भिवडी शहराचे डीसीपी राजकुमार शिंदे यांनी सागितले. त्याच बरोबर नागरिकांना त्यांनी आवाहन केले आहे कि गरज नसताना घरा बाहेर पडू नका.पोलिस आणि प्रशासनाला मदत करा,आम्ही सर्व तुमच्यासाठीच काम करत आहोत. आपण सगळे मिळून कोरोना व्हायरसचा मुकाबला करूया.नागरिकांनी जर सहकार्य केले नाही.तर आम्हाला सक्ती करावी लागेल.त्यामुळे घरीच राहून आम्हाला सहकार्य करा.देशाला सहकार्य करा.    

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web