प्रतिनिधी .
पुणे – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यातच आता महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती येत आहे. दरवर्षी आपण या दोन्ही महापुरुषाच्या जयंत्या मोठ्या जलोशात एकत्र साजऱ्या करीत असतो.पण या वर्षी कोरोनाचे मोठे संकट देशावर आले आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी यंदाची जयंती आपण घरातूनच साजरी करावी. घरातील जयंतीचे फोटोज, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून इतरांनाही जयंती घरातून साजरी करण्यास सांगावे. असे आवाहन बाळासाहेबांनी सर्व जनतेला केले आहे.
कोरोनाचा संसर्ग थांबविणे हि आपली मोठी जबाबदारी आहे. आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जमा केलेला निधी सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच ह्या कोरोनाच्या काळात जी लोकं आपला जीव धोक्यात घालून काम करताय अशा हातावर पोट असणाऱ्या समूहाला द्यावा. त्याचं संरक्षण करणे ही पण आपली जबाबदारी आहे. अशा लोकांची चूल विझणार नाही, याची आपण काळजी घ्यावी. गरजू लोकांना अन्नधान्य,जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून आपली महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी. असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेस केले आहे.