प्रतिनिधी.
कल्याण- कल्याण-डोंबिवलीत दिवसदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कल्याण डोंबिवलीचे महापालिकेचे कर्मचारी युद्धपातळी काम करत असून आज दि.४ एप्रिल रोजी आणखी 3 रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या २४ वर जाऊन पोहचली आहे.
कोरोना या संकटाचा सामना करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण व डोंबिवली परिसरातील खाजगी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व अनेक आरोग्यसेवा कर्मचारी यांनी एकत्रित येऊन या रोगाशी दोन हात करण्यासाठी पालिकेला सहकार्य करा, आपल्या डिग्री, आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग जनतेसाठी करा. आपली मदत आपल्या शहराला आधार देऊ शकते. अनेक रुग्णालय विलगीकरणासाठी व आरोग्यसेवा कर्मचारी उपलब्ध व्हावे म्हणून महानगरपालिकेमार्फत असे आवाहन आयुक्त सूर्यवंशी यांनी खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्याना केले आहे.