प्रतिनिधी.
पुणे- रविवारी म्हणजे येणाऱ्या पाच तारखेला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातले दिवे बंद करुन मेणबत्ती, तेलाचे दिवे किंवा मोबाईल टाॅर्च लावा, असे आवाहन पंतप्रधान मोदीं यांनी आज सकाळी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला केले. त्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, “देशाला आशा होती की मोदी साहेब जीवनावश्यक वस्तूंबाबत बोलतील. भारतातील कुठलाही नागरिक उपाशी झोपणार नाही, याबद्दल बोलतील. सॅनिटायझर व औषधं, मास्क याची उपलब्धतता मुबलक प्रमाणात असेल व कुणालाही औषधं कमी पडणार नाही, यावर बोलतील. कोरोनावर आम्ही एक नवीन लस शोधून काढतोय यावर बोलतील. रुग्णांना टेस्टिंग कीट कमी पडणार नाहीत यावर बोलतील. कोरोनामुळे भयग्रस्त झालेल्या जनतेला आधार देतील, असं वाटलं होतं,
प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट कसा करावसा वाटतो यांना? असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना थेट केला. लोकांच्या जीवनात अंधार पसरलेला असताना पंतप्रधानांनी त्यांच्या जीवनात उजेड आणण्याची आवश्यकता आहे आणि अशा वेळी ते म्हणतात अंधार करा आणि दिवा पेटवा,मोबाईलचे टाॅर्च पेटवा हा तद्दन मुर्खपणा आहे. नादान बालीशपणा आहे. मी आज जाहीर करु इच्छितो की मी लोकांसाठी काम करतोय.ते तेल आणि मेणबत्तीचे पैसेही मी गरीबांना देईन. मी माझ्या घरातले लाईट सुरु ठेवणार व एकही मेणबत्ती पेटवणार नाही.मी मूर्खपणा करणार नाही.