कोरोनाच्या लढाईत मध्य रेल्वे सज्ज जीवनावश्यक वस्तूची वाहतूक युध्दपातळीवर

प्रतिनिधी.

मुंबई- कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आला आहे. सर्व सरकारी यंत्रना आपापल्या या संकटाचा सामना करीत आहे. त्यात रेल्वेही आपल्या परीने कोरोनाच्या लढाईत सज्ज झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेची प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण रेल्वेची माल वाहतूक हि युद्ध पातळीवर सुरु आहे.लोकांना या लॉकडाऊन मध्ये रेल्वेच्या या मालवाहतुकीचा फार मोठा उपयोग झाला आहे जीवनावश्यक गोष्टीची कमतरता या मुले लोकांना जाणवली आहे.वेगवेगळ्या गुड्स शेड,स्टेशन आणि नियंत्रण कार्यालयात रेल्वे कर्मचारी २४ तास काम करत आहे, व या संकट समयी देशाला मोठे योगदान करत आहे. त्यामुळेच जीवनावश्यक वस्तूची एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण देशभर वाहतूक करण शक्य झाले आहे. २८,५५५ मालडब्यातून हि वाहतूक शक्य झाली आहे .२८,५५५, लोड केलेल्या मालडब्यामध्ये  कोळसा,पेट्रोलियम उत्पादने,कंटेनर,अन्यधान्य, खाद्यपदार्थ,कांदा,साखर या जीवनावश्यक वस्तूचा समावेश आहे. या सर्व जीवनावश्यक वस्तू गरज असलेल्या देशाच्या विविध भागात रेल्कवे मालगाडयातून पोहचवली जात आहे आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आजून हि वाहतूक सुरूच राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूची वाहतुक मुंबई पुणे,भुसावळ,नागपूर,सोलापूर या रेल्वेच्या विभागातून करण्यात आल्याची रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे .

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web