टाटा ग्रुपने जपला सामाजिक बंधिलकीचा वसा कोरोनासाठी १५०० कोटीची मदत.

प्रतिनिधी.

मुंबई – कोरोना हे आता पर्येंतचे देशापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. टाटा ग्रुप मधील कंपन्यांनी नेहमीच कठीण काळात देशाला मदत केली आहे.आणि कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी टाटा  ग्रुपने देशला १५०० कोटीची मदत केली आहे.यात टाटा सन्स १००० कोटी तर टाटा ट्रस्ट ५०० कोटी देणार आहे. असे टाटा ट्रस्ट चे अध्यक्ष रतन टाटा यांनी जाहीर केले. कोरोनाच्या या लढाईत देशाला आज सर्वात जास्त निधीची गरज आहे. कारण कोरोनासाठी ज्या आरोग्य विषयक पायाभूत सुविधा लागणार आहे, त्याला मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. या निधीचा उपयोग आरोग्य कर्मचारी,डॉक्टर यांना लागणारे साहित्य,उपकरने,व्हेनटीलेटर,टेस्टिंग किट्स, त्याच प्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण यावर केला जाणार आहे. देशाला संकट समयी एवढी भरगोस मदत करून टाटा समूहाचे देशावरील प्रेम दिसून येत आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web