प्रतिनिधी
मुंबई-जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे त्याचा परिणाम संपूर्ण क्षेत्रात जाणवत आहे सर्व सरकारी यंत्रणा त्याकामी लागल्या आहेत. अर्थव्यवस्थेवर हि मोठी झळ बसली आहे. त्यावर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रिझर्व बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.रिझर्व बँकेने सर्वसामान्यांना दिलासा देत रेपो दरात ०.७५ टक्क्याची कपात केली आहे.आता ४.४० टक्क्यावर आला आहे. तर रिव्हर्स रेप्पो दरात देखील ०.९० कपात करून तो ४ टक्क्यावर आणला आहे. रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात कपातीची घोषणा केली आहे. रेपोदरात कपात झाल्यामुळे त्याचा फायाला कर्जदारांना होणार आहे.रेपो दारात कपात केल्यामुळे कर्जाचा हप्ता कमी होण्यास मद्दत होईल. ईएमआय वसुलीला तीन महिन्यासाठी स्थगित द्यावी असा सल्लाही गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बँकांना दिला.