कोरोनाच्या केजरीवाल सरकार सज्ज,रोज ४ लाख गरजू लोकांना देणार मोफत जेवण.

प्रतिनिधी

 दिल्ली- करोनाने जगभर थैमान घातले आहे. प्रत्येक राज्य हे लोकांसाठी आपल्या पद्धतीने उपाय योजना करत आहे.लोकांनी केजरीवाल सरकारच्या उपाययोजना आणि प्लानिंग चे खूप सारे कौतुक केले आहे.आता दिल्लीत ३९ रुग्ण आहेत करोनाच्या विषाणूने जर तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला तर रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू शकते. हा धोका नियंत्रणात अनन्यासाठी केजरीवाल सरकारने पाच डॉक्टरची एक टीम बनवली आहे. त्या टीम ने एक कृती आराखडा बनविला आहे.प्रतिदिन जरी एक हजार जरी नवे कोरोनाचे रुग्ण आले तरी त्याचा एका वेळी त्याच्यावर उपचार करण्यासाठी दिल्ली सरकार सज्ज असेल.असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सागितले.परिस्थिती जर गंभीर झाली तर कशा पद्धतीने तिचा सामना करायचा याचा आढावा घेण्यात आला आहे.  

दिल्लीत येऊन मजुरी करणाऱ्या हातमजुरांची जेवणाची जबाबदारी हि दिल्ली सरकारची आहे.लॉकडाऊन मुले काम नसल्यामुळे मजुरांना दोन वेळच्या जेवणाची चिंता होऊ लागली आहे.ते आपल्या गावी शेकडो मिल पायी चालत स्थलांतरकरीत आहेत. पण अनेकांना तेही शक्य नसल्यामुळे मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे .

या मजुरांसाठी २२५ सरकारी शाळानमध्ये मोफत राहण्याची व मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे .दररोज 20 हजार लोकांना दिल्ली सरकार मोफत जेवण पुरवत होते आता त्याची संख्या वाढवून आता हि संख्या २ लाख लोकांन पर्येंत पोहचविण्यात आली आहे. ५६८ शाळान मध्ये आज पासून ४ लाख गरीब लोकांना दोन वेळचे जेवण हे मोफत दिले जाणार आहे.त्याच बरोबर त्याची राहण्याची सोय केली आहे. त्याच बरोबर कोणीही गरीब दिल्लीत उपाशी राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सागितले.     

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web