ठाणे- (संघर्ष गांगुर्डे) जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची विक्री करणारी सर्व दुकाने, पानटपऱ्या इ. पुढील आदेश येईपर्यत बंद ठेवण्यात यावीत असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. सदर आदेश बुधवार दि. १८मार्च२०२० पासुन तात्काळ लागू करण्यात आला आहे.देशात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुकणे व धुम्रपान करणे यामुळे कोरोना विषाणू (COVID-१९) चा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्या इ.वर बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था ,असंस्था, संघटना, महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२० चे नियम ११ नुसार, भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार, दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहील.दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.