भिवंडीत एबीपी माझाच्या पत्रकारावर हल्ला ; कोरोना संदर्भातील बातमी करतांना झाला हल्ला

भिवंडी – एकीकडे जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी ठाणे जिल्हात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थावर शासनाने बंदी आणली आहे.याचं संदर्भातील बातमी संकलनासाठी गेलेल्या एबीपी माझा वृत्त वाहिनीचे पत्रकार अनिल वर्मा यांना मारहाण झाली. सध्या कोरोनाने देशासह राज्यात थैमान घातले असतांना या संदर्भातील बातमी संदर्भात खंडूपाडा येथील पंजाबी हॉटेल येथे असलेल्या पाणीपट्टीच्या बाजूला गुटका व पान खाऊन थुंकणाऱ्या इसमांची बातमी करण्यासाठी वर्मा याठिकाणी गेले होते. यावेळी गुटका खाऊन थुंकणाऱ्या इसमांची केमेऱ्याने शूटिंग करत असतांना येथील गुटका व पान खाणाऱ्या तीन ते चार इसमांना या बाबत राग आल्याने त्यांनी पत्रकार अनिल वर्मा यांना अडवून त्यांना मारहाण केली व त्याचा केमेरा घेऊन पळ काढला. याप्रकरणी पत्रकार वर्मा यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या घटनेचा शहरातील पत्रकारांनी निषेध करत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी लावून धरली होती.

भिवंडीत कोरोना व्हायरस संबंधी जनजागृती करण्यासाठी लोकांची मुलाखत घेत  होते. सदर मुलाखत चालू असताना आश्रफ नावाचा इसम  व त्याचे तीन साथीदार यांनी फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण करून त्यांचे ताब्यातील कॅमेरा व माईक असा एकूण 1,21,000/-  रु की चा मुद्देमाल फिर्यादी यांचे ताब्यातून जबरी चोरी करून घेऊन गेल्याने सदरचा गुन्हा दाखल केला.

    सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तांत्रिक बाबींचा व गुप्त बातमीदारा मार्फत  माहिती प्राप्त करून  सदर गुन्ह्यातील आरोपी हे  पळून जाण्याच्या तयारीत असल्याची  माहिती प्राप्त झाल्याने  पोनि/ कबाडी,  पोनि/नितीन पाटील , पोउनि/भवर ,पोना/नागरे, पोना/2076 राणे,पोना/3373 वेताळ, पोना/1051इथापे,  पोशि/2887 मोहिते, यानी सापळा रचून  आरोपी नामे  1) अश्रफ अली मोहम्मद सादिक अन्सारी  वय 43  रा.निजामपुरा भिवंडी 2) मोहम्मद वसीम  मुमताज शेख  वय 38  रा.गैबी नगर भिवंडी 3) इरशास अहमद शेख उर्फ दानिश वय 38  रा. मिल्लत नगर भिवंडी यांना ताब्यात घेण्यात आले.  आरोपी नामे अश्रफअली मोहम्मद सादिक अन्सारी  याचे ताब्यात  सदर गुन्ह्यातील  फिर्यादी यांचा  कॅमेरा  मिळून आल्याने  तो जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात  आरोपींचा  सहभाग स्पष्ट झाल्याने सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास  पोनिरी (गुन्हे) नितिन पाटील हे करीत आहेत. पत्रकार हे वेळी आपला जीव धोक्यात घालून वृतांकन करीत असतात समाजाला त्याचा उपयोग व्हावा हा त्या मागचा उद्देश असतो पण तर पत्रकारां वर वृताकन करताना हल्ले होत असतील तर सरकारने हल्ले खोरांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web