राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन  

 विशेष -: आज १० मार्च राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा  स्मृतिदिन. सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीका होत्या त्याच प्रमाणे  त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि विद्याग्रहण करणाऱ्या पहिल्या महिला देखील आहेत.आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता खर्ची घातले. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतांना सावित्रीबाईंना अनेक त्रासाला सामोरे जावे लागले परंतु त्यांनी हार मानली नाही. खचून न जाता संपुर्ण आत्मविश्वासाने आपले कार्य अविरत चालू ठेवले.

सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्या सोबत झाला .लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायाला शिकविले.त्या काळात  स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे पापच मानले जाई. स्त्रि शिक्षणाच्या विरोधात सारा समाज होता.समाजाच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण केले.शिक्षण पुर्ण केल्यानंतर आपल्या या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या सामाज द्रोहापेक्षा   कमी नव्हतां.महिलांनी शिक्षण घेणे म्हणजे त्या काळात अशक्यच. ज्योतिबा फुले वा सावित्री बाई या जोडप्यांनी मुलींसाठी समाज विरोध पत्करून पहिली शाळा पुण्यात काढली   सावित्रीबाई शिकविण्याकरता ज्यावेळेस घरून शाळेसाठीनिघत असत त्यावेळी त्यांना अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागत असे.सावित्रीबाईंवर शेण, दगड, कचरा फेकण्यात येते असे, त्यांना शिवीगाळ केली जात असे तरी देखील त्या डगमगल्या नाहीत, ध्येयापासुन परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि स्त्रिशिक्षणाचा हाती घेतलेला वसा पूर्ण केला.ज्योतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता 1 जानेवारी 1848 पासुन 15 मार्च 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. 1849 ला पुणे इथं उस्मान शेख या मुस्लीम बांधवाच्या घरी मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली केवळ शिक्षण क्षेत्रापुरते त्यांचे कार्य मर्यादित न ठेवता.विधवांची परिस्थीती सुधारावी म्हणुन कार्य केले. त्याच बरोबर त्यांनी आश्रमाची उभारणी केली दलित आणि अस्पृश्य समाजाकरता त्यांनी कार्य केलं.

ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर सुध्दा त्या सतत समाजकार्यात  राहिल्या आणि समाजाचे ऋण फेडत राहिल्यात. 1897 ला पुण्यात महाभयंकर अशी प्लेगची साथ सुरू झाली. सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सेवा करीत राहिल्या अश्यातच त्यांना देखील या आजाराची लागण झाली.  आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज स्त्रिया शिक्षण घेवून मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत हि सगळी राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले याची देणगी आहे अशा या महान क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web