भिवंडी:- ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. महिलाच्या प्रती सम्मान प्रशंसा प्रकट करत हा दिवस साजरा केला जातो. एक महिला तिचे अनेक रूपे आहेत. ती कुणाची तरी मुलगी असते,पत्नी असते,कुणाची सून असतेतर कुणाची आई असते अशा वेगवेगळ्या भूमिका ती बजावत तर असते पण त्याच बरोबर आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा आपले कर्तव्य चोख बजावत असते. अशीच एक नारीशक्त्ती आहे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्रीमती ममता लोंरेंस डिसोझा नुकतच त्यांना संवेदनशील भागात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल वूमन आयकॉन या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.जागतिक महिलादिनी जाणून घेऊयात त्यांच्या विषयी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) 1990 परीक्षेत उतीर्ण होऊन त्यांनी पोलीस दलात प्रवेश केला. आणि आपले जीवन लोकसेवेसाठी वाहून घेतले. गेली तीस वर्ष त्या आपली सेवा निष्ठेने पार पाडत आहेत. अत्यंत शिस्त प्रिय आणि मेहनती अधिकारी म्हणून त्याची पोलीस दलात ओळख आहे.आता पर्येंत ठाणे शहर,बृहनमुंबई,नवी मुंबई ठाणे ग्रामीण,विशेष शाखा,वाहतूक शाखा,क्राईम ब्रांच आशा वेगवेगळ्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करून ममताजीनी आपली छाप सोडली आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या केसेस त्यांनी योग्य त्या शिताफीने हाताळून फिर्यादीस योग्य तो न्याय आणि गुन्हेगारास शिक्षा मिळवून देण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. आपल्या उत्कृष्ट कार्यामुळे ममताजीना १८० पेक्षा जास्त पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. सध्या ममताजी भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी कार्यरत आहेत.तिथेही त्यांनी आपली कामगिरी दाखून दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा तर दिल्याच पण एक महत्वाचा संदेश सुद्धा दिला आहे महिलांनी योग्य शिक्षण घेऊन स्वताच्या पायावर उभे राहून प्रत्येक क्षेत्रात आपली चुणूक दाखवली पाहिजे त्याच प्रमाणे येणाऱ्या संधीचे सोने केले पाहिजे ज्या महिलांना घरच्या जबाबदारी मुले बाहेर पडता येत नाही त्यांनी घरी बसुन काही काम केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. त्याच बरोबर त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकार्याचे आभार मानले त्याच बरोबर त्यांनी त्याचा सहकाऱ्याचे व नागरिकाचे आभार मानले. यावरून त्याचा साधेपणा सुद्धा दिसून येतो. आज वरिष्ठ पोलीस निरीक्षिकाची जबाबदारी पार पाडून घराचीही जबाबदारी योग्य पद्धतीने संभाळत आहे. अशा रणरागिणी महिला पोलीस अधिकारी श्रीमती ममता लॉरेन्स डिसोझा यांना नेशन न्युज मराठी कडून मानाचा सलाम.