रिझर्व बँकेचे येस बँकेवर आर्थिक निर्बंध खातेदाराच्या बँकेबाहेर रांगा

कल्याण –रिझर्व बँकने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्या नंतर कल्याण आणि आसपासच्या परिसरातील येस बँकेच्या शाखांमध्ये खातेदारांची मोठी गर्दी झाली आहे.पैसे काढण्यावर मर्यादा आल्यामुळे अनेक खातेदार हवालदिल झाले आहे.खातेदारांन मध्ये भितीचे वातावरण निर्मान झाले आहे कल्याण पश्चिमेतील बँकेच्या शाखेबाहेर पैसे काढण्यासाठी खातेदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहे.
येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून SBI चे माजी मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खातेदारांनी घाबरू नये, असं आवाहनही रिझर्व्ह बँकेने केलं आहे. दरम्यान, गेल्या वर्षी पीएमसी बँकेवरही निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे खातेदारांचे मोठे हाल झाले होते.
येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. 50 हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना फक्त वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील. येस बँकेवर सरकारने केलेल्या कारवाईमुळे येस बँकेच्या खातेदारांनमध्ये भितीचे वातावरन पसरले आहे वाढत्या कर्जाच्या बोज्यामुळे येस बँक अडचणीत आली आहे.आता सामान्य जनतेने आपला मेहनतीचा पैसा कोणत्या बँकेवर विश्वास ठेवून ठेवावा हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web