शिवकालीन पेहरावात चिमुकल्यांची शिवजयंती साजरी

प्रतिनिधी :- कल्याण मधील चांम्स किड्स प्री स्कूल च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज्याची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमिताने छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी पालखी काढण्यात आली होती. या सोहळ्याचे आकर्षण ठरले ते म्हणजे शाळेतील सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन पेहराव परिधान केला होता. मावळ्याची वेशभूषा केली होती. हातात भगवे झेंडे घेतले होते.
नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजाचा स्पुर्तीदायक इतिहास,शौर्य व शिवकालीन सांस्कृतिक इतिहासाची माहिती व्हावी तसेच बालमनावर महाराजांचे संस्कार रुजावे त्याच बरोबर नवीन पिढीला प्रेरणा मिळावी हा शाळेचा उद्देश होता. या सोहळ्यात चिमुकले विद्याथी,पालकवर्ग,व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. जय शिवाजी जय भवानी या घोषणेने सारे वातावरण दुमदुमले होते.
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web