कल्याण डोंबिवली महापालिकेचा खादाड अभियंता १५ हजाराची लाच घेताना अटक.

कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्टसिटी बनली नाही मात्र येथील अधिकारी पैसे खाण्यात खूपच स्मार्ट झाल्याचे दिसून येत आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकाऱ्यांच काम कमी आणि खाऊगिरी जास्त दिसत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला आज 15 हजारांची लाच घेताना ठाणे अँटी करप्शनने रंगेहात पकडले.बाळासाहेब जाधव असे या कार्यकारी अभियंत्याचे नाव असून महिला ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी ही लाच घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वच्छ भारत अभियानंतर्गत संबंधित ठेकेदाराने काम केले होते. त्याचे बिल काढण्यासाठी ही महिला ठेकेदार वारंवार या अभियंत्याच्या दालनात चकरा मारत होती. मात्र माझे पैसे दिल्याशिवाय बिलाची फाईल मंजूर करणार नाही अशी मागणी जाधवने केली. त्यावर आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आपल्याला पैशांची गरज असल्याची विनती करूनही या खादाड अभियंत्याने पैशाची मागणी लावून धरली. त्यामूळे या ठेकेदाराने अखेर ठाणे अँटी करप्शनकडे याबाबत तक्रार केली.त्यानूसार अँटी करप्शन विभागाने बाळासाहेब जाधवला 15 हजारांची लाच घेताना आज संध्याकाळी या रंगेहात अँटी करप्शनने पकडले. कल्याण डोंबिवलीच्या नविन आयुक्त प्रशासनातील अशा खादाड आधिकार्यांवर काय कारवाई करतात यावर सर्वाचे लक्ष लागले राहिले आहे
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web