गुंतवणुकीचे मार्ग उद्यासाठी

प्रत्येक व्यक्तीला पुढील आयुष्यासाठी काही तरी गुंतवणूक करावी आशी इच्छा असते कारण याच गुंतवणुकी वरून भविष्यकाळात येणाऱ्या गरजा आपन पूर्णं करू शकतो. पण गुंतवणूक करताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे व त्या नुसार आभ्यास करून योग्य पद्धतीने आपण गुंतवणूक केली पाहिजे. तर आपण आज पाहूयात कोणकोणत्या पद्धतीने गुंतवणूक करू शकतो त्यातील काही मार्ग पुढील प्रमाणे.
१) बँक – बचत खाते,एफ डी,आर डी असे बँकेत गुंतवणूक करण्याचे मार्ग आहेत खाजगी व सहकारी बँकेचे व्याज दर सरकारी बँकेपेक्षा जास्त असतात तरी गुतंवणूक करताना योग्य ती काळजी घेऊन नीट शहानिशा करून बँकेत गुतवणूक केली पाहिजे.
२) पोस्टाची गुतंवणूक – पोस्टातील गुतंवणूक हि संपूर्ण पणे सरकारी असल्या मुले जोखीम खूपच कमी असते बहुदा नसते पोस्टात राट्रीय बचत प्रमाणपत्र ,पी पी एफ खाते,किसान विकास पत्र त्याच प्रमाणे आली कडे निघालेली सुकन्या समृद्धी योजना अशा योजना मध्ये आपण गुतंवणूक करू शकतो .
३) बॉंडस- सरकार बाजारमध्ये बॉंडस विकण्यासाठी आणत असतात त्याच प्रमाणे कंपन्याचे सुद्धा बॉंडस असतात. पण सरकारी बॉंडस मध्ये जोखीम कमी असते .
४) कमोडीटी बाजार– या मध्ये भाज्या फळे धातू शेती मध्ये गुंतवणूक करणारे व्यापारी याचा फायदा घेऊ शकतात.याचा आभ्यास करून गुंतवणूक करावी लागते.
५) शेयर मार्केट – यामध्ये योग्य पद्धतीने आभ्यास करून गुतंवणूक करावी लागते. स्वतः कंपन्याचा आभ्यास करून गुतंवणूक केल्यास जोखीम कमी असते.फसव्या टिप्स आणि इतरचा सल्ला न घेता गुंवणूक केली तर उत्तम.
६) रियल इस्टेट- या मध्ये घर जमीन ,शेत जमीन एन ए प्लॉट आशा प्रकार मध्ये गुतंवणूक करता येते. यात जोखीम कमी असते पण कागद पत्रे वा सरकारी कागद पत्राचा योग्य तो आभ्यास हवा.
७) सोने- आपण सोन्या मध्ये हि गुंतवणूक करू शकतो पण यात सुरक्षिततेचा व गहाळ होण्याचा असे दोन प्रश्न आहे. म्हणून आपण सरकारी बँकामध्ये जे गोल्ड बॉडस विकायला काढले जातात त्या मध्ये आपण गुंतवणूक करू शकतो.
८) म्युच्युअल फंड- या मध्ये हि आपण योग्य आभ्यास करून काळजी घेऊन गुंतवणूक करू शकतो .वेगवेगळ्या कंपन्याचे म्युच्युअल फंड बाजारात उपलब्ध आहेत. बाजाराच्या उतार चढावर यातील उत्पन्न आवलंबून असते पण योग्य रीतीने जर दीर्घ काळ गुंतवणूक केल्यास आपणाला हा एक गुंतवणूकीचा मार्ग आहे.
आपण हे काही गुंतवणुकी चे मार्ग पहिले आहे पण गुंतवणूक करताना योग्य तो आभ्यास आणि योग्य पद्धत हे दोन फायद्याचे महामंत्र ठरू शकतात.
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web