दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज निकालानंतर दिल्लीतील जनतेचे खूप खूप आभार मानले दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला दिल्लीतील जनतेने तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे.आणि विरोधकांना धुळ चारली आहे. हा विजय माझा नसून दिल्लीकरांचा आणि देशाचा विजय आहे असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.जनतेसाठी जो पक्ष काम करेल त्याचाच विजय होईल हे दिल्लीकरांनी दाखवून दिले आहे असंही केजरीवाल यांनी सांगितले. आपल्या भाषणात अरविंद केजरीवाल यांनी हनुमानाचे आभार मानले. प्रचारा दरम्यान केजरीवाल यांनी हनुमान चालीसा वाचल्याचा फोटो व्हायरल झाला होता, त्यावरुन केजरीवाल यांनी भाजपला टोला लगावला.

