लोककल्याणकारी राजा महाराजा सयाजीराव गायकवाड

अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या गोपाल (बालपणीचे नाव ) पुढे बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यू नंतर बडोद्याच्या राजघराण्यात दत्तक म्हणून गेले आणि महाराजा म्हणून सिंहासनावर आरूढ झाले
सयाजीराव महाराजांनी आपल्या छोट्याशा संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्या. न्यायव्यवस्था, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण, दिन दलितां साठी शाळा, अस्पृश्यता निवारण, संस्कृत ग्रंथ प्रकाशन, कला शिक्षणाची सोय, सर्वसामान्य माणसांसाठी अशा कितीतरी सुधारणा त्यांनी प्रत्यक्षात आणल्या. या व्यतिरिक्त स्त्रियांच्या बाबतीतही पुढाकार घेऊन त्यांचे हक्क त्यांना मिळावेत म्हणून खूपच प्रयत्न केले. बालविवाह बंदी, स्त्रियांना वारसाहक्क, विधवा विवाह, कन्याविक्रय बंदी, पडदा पद्धती बंद इ. सुधारणा आपल्या संस्थानात करून स्त्रियांना आधुनिक युगाचे दालन उघडून दिले. अत्यंत पुरोगामी विचाराच्या या महाराजाने राष्ट्रीय, सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले. महात्मा ज्योतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील आशा थोर समाज सुधारक मंडळीना पाठबळ दिले.
भारतभूमीचा एक ‘आदर्श राजा’ हा किताबही पंडित मदनमोहन मालवीय यांच्याकडून त्यांना प्राप्त झाला.अशा या आदर्श ,लोककल्याणकारी राजाचे ६ फेब्रुवारी १९३९ रोजी निधन झाले. महाराजा सयाजीराव गायकवाडयांच्या अजरामर कार्यास विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web