हिरकणी मोटर वूमन मनीषा म्हस्के

मुंबई : मध्य रेल्वेवरील पहिली वातानुकूलित लोकल काही दिवसा पासून सुरू झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर ही वातानुकूलित लोकल धावली. ठाणे-पनवेल मार्गावर पहिली वातानुकूलित लोकल धावली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वातानुकूलित लोकलला हिरवा झेंडा दाखविला. पश्चिम रेल्वेवर दोन वर्षांपूर्वी वातानुकूलित लोकल दाखल झाली होती. दोन वर्षानंतर मध्य रेल्वेची एसी लोकल धावली. एसी लोकल धावली या वेळी मध्य रेल्वे चा फार मोठा गवगवा झाला त्याच बरोबर मोठ मोठ्या बातम्या आल्या त्या गाडीचे तोंड भरून कौतुक करण्यात आले . पण या लोकल मधील एक विशेष बाब होती ती म्हणजे या लोकल ची चालक मोटर वूमन मनीषा मस्के
मनीषा मस्के या उल्हासनगर शहरात राहत असून त्यांनी आपले शिक्षण फार प्रतिकूल परीस्थितीत पूर्ण केले. त्यानंतर त्याने रेल्वे मध्ये नोकरी मिळवून. लोकल चालकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. व मोटर वूमन झाल्या. लोकल चालकाचे प्रशिक्षण खूप कठीण पद्धतीचे असते. त्याच बरोबर खूप जबाबदारीचे सुद्धा असते.कारण यात सर्व प्रवाशाची जबाबदारी हि चालकाची असते. त्याच बरोबर सतर्कपणा हि अंगी हवा मोटरमन म्हटले कि या क्षेत्रात फक्त पुरुषाचा समावेश होता पण आता अपवाद ठरल्या आहेत मनीषा मस्के सारख्या जिद्द व चिकाटी असणाऱ्या महिला. मध्ये रेल्वे च्या पहिल्या एसी लोकल चालवण्याचा मान मिळाला तो मोटर वुमन मनीषा म्हस्के याना. बाकीच्या सर्व जबाबदाऱ्या साभाळून आपले मोटर वूमन चे काम हे चोख बजावत आहे अशा या हिरकणी मोटर वूमन मनीषा म्हस्के यांना नेशन न्युजकडून मानाचा सलाम.
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web