तान्हाजी – द अनसंग वॉरिअर आता करमुक्त

मुंबईः प्रतिनिधी तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. या लढाईत तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले होते. याच लढाई नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव कोढाना हे बदलून सिहगड ठेवले होते. या लढाईवरील आधारित असलेला चित्रपट “तान्हाजी – द अनसंग वॉरिअर” या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्याने करसवलत दिली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुद्धा कर सवलत देण्याचा निर्णय घेतला.

या चित्रपटासाठी चित्रपटगृहांनी तिकिट दरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी) प्रेक्षाकांकडून वसूल न करता चित्रपटगृहाने स्वत: राज्य शासनाच्या तिजोरीत भरण्याचा निर्णय झाला. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून 30 एप्रिल 2020 पर्यंतच्या कालावधीतील तिकिट विक्रीवरील राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा देण्यास मान्यता देण्यात आली. त्या मुळे प्रेक्षकांना कमी तिकीत दरात आता तानाजी सिनेमा पाहता येणार आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web