व्हिडीओ द्रारे केवायसी करण्यास रिझर्व बँकेची ची मान्यता दुर्गम भागातील नागरिकाना दिलासा

नवी दिल्ली- बँका आणि ग्राहकाच्या सोयी साठी व्ही –सिआयपी प्रक्रिये ला रिझर्व बँकेने मान्यता दिली आहे आता आधारकार्ड च्या माध्यमातून व्हिडीओ कस्टमर आयडेटीफिकेशन प्रोसेस ला मान्यता मिळाली आहे.
कर्ज देणाऱ्या कंपन्या सध्या उपलब्ध असलेल्या ई-केवायसी सुविधेला पर्याय म्हणून नव्या सुविधेचा वापर करू शकणार आहे रिझर्व बँकेने या विषयी पत्रक जारी केले आहे. ग्राहकांना केवायसी साठी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे से नमूद करण्यात आले आहे. रिझर्व बँकेने आधार कार्ड च्या माध्यमातून व्हिडीओ कस्टमर आयडेटीफिकेशन प्रोसेस ला मान्यता दिल्याने संबंधित बँकेचे अधिकारी आधारकार्डशी संबधीत प्रश्न विचारून ग्राहकाची ओळख पटवू शकणार आहेत.या शिवाय ग्राहक संबधित देशातच आहे याची खात्री पटून देवा लागणार आहे.गुगल किवा व्हाटअप च्या माध्यमातून व्हिदिओ कॉल करू शकणार नाही.याची काळजी संबंधित बँकेला घ्यावी लागेल. दुर्गम भागातील नागरिकांना या सुविधेचा फार मोठा फायदा होईल आशी शक्यता वर्तवली जात आहे.त्याच प्रमाणे या सुविधेमुळे ग्राहकाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web